Limitless customization options & Elementor compatibility let anyone create a beautiful

Contact info

कार्यालयीन पत्ता: हिस्सा क्र. १८२, मुख्य रस्ता, आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर - ४१६२०९ (महाराष्ट्र) ९५२७५९७७३१ balumamafoundation@gmail.com Office Hours: 8AM - 5PM Sunday - Weekend Day

मरगूबाई मंदिर नियोजित आराखडा
(₹१०० कोटी प्रकल्प संकल्प)

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मरगूबाई मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बाळूमामांच्या या पावन स्मृती जपण्यासाठी तब्बल ₹१०० कोटींचा स्वतंत्र प्रकल्प संकल्प हाती घेण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी नियोजित प्रकल्पाची सुरुवात येत्या ४ सप्टेंबर २०२६ च्या समाधी दिनापासून करण्यात येत आहे.

मरगूबाई मंदिर नियोजित प्रकल्पातील प्रमुख विकासकामे व घटक:

क्र. विकास घटक तपशील व स्वरूप
मरगूबाई भक्तिधाम श्री बाळूमामा भक्तांचे निवास प्राथमिक सुविधा, आधुनिक वाचनालय, फिटनेस सेंटर निर्मिती.
पायाभूत सुविधा व परिसर सुशोभीकरण २४ तास अखंड वीज व्यवस्था (सौर ऊर्जा प्रणाली), हायमास्ट दिवे, शुद्ध पिण्याचे पाणी, सुलभ स्वच्छतागृहे आणि अंतर्गत रस्ते/काँक्रीटीकरण.
मूळ समाधी मंदिर व गाभारा जीर्णोद्धार ज्या पवित्र ठिकाणी बाळूमामांनी समाधी घेतली त्या मूळ मंदिराचे व गाभाऱ्याचे ऐतिहासिक पावित्र्य राखून आधुनिक पद्धतीने संवर्धन व नूतनीकरण.
अहिल्याबाई होळकर भवन व सभागृह राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांच्या ₹१.कोटीं २० लाखाच्या निधीतून उभारण्यात येत असलेले भव्य अहिल्याबाई होळकर भवन व बहुउद्देशीय सभागृहचे पावित्र्य जपणे व धनगर समाजाचे दैवत अहिल्याबाई होळकर प्रतिकृती (मोठा फोटो) स्थापन करणे. व पिवळा ध्वज उभारणे.
भव्य सभामंडप व दर्शन रांग व्यवस्थापन सभामंडपाचा विस्तार, ऊन-पावसापासून संरक्षणासाठी आधुनिक शेड्स आणि गर्दीच्या वेळी भाविकांसाठी सुसज्ज दर्शनरांगा निर्मिती. (Barricading System).
अखंड अन्नछत्र व महाप्रसादालय दररोज हजारो भक्तांसाठी विनामूल्य, सात्विक व शुद्ध महाप्रसादाची भव्य बैठक व्यवस्था, आधुनिक किचन.
अखंड शांती महायज्ञ व ज्योत प्रज्वलन करणे जगात शांतता नांदावी यासाठी हा पथदर्शी प्रकल्प सुरू करणे.
आदमापूर निरंतर स्वछता अभियान गाडगेबाबा स्वछता आर्मी स्थापन करून तीर्थक्षेत्र आदमपुरची ओळख स्वछ नगरी अशी करणे.
५१ फूट उंच भव्य श्री बाळूमामा पुतळा आदमापूरच्या परिसरामध्ये ५१ फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचा मानस, जो भाविकांसाठी मुख्य आध्यात्मिक आकर्षण ठरेल.

Add Title

Add Sub Title