Limitless customization options & Elementor compatibility let anyone create a beautiful

Contact info

कार्यालयीन पत्ता: हिस्सा क्र. १८२, मुख्य रस्ता, आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर - ४१६२०९ (महाराष्ट्र) ९५२७५९७७३१ balumamafoundation@gmail.com Office Hours: 8AM - 5PM Sunday - Weekend Day

मरगूबाई मंदिर नियोजित आराखडा
(₹१०० कोटी प्रकल्प संकल्प)

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मरगूबाई मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बाळूमामांच्या या पावन स्मृती जपण्यासाठी तब्बल ₹१०० कोटींचा स्वतंत्र प्रकल्प संकल्प हाती घेण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी नियोजित प्रकल्पाची सुरुवात येत्या ४ सप्टेंबर २०२६ च्या समाधी दिनापासून करण्यात येत आहे.

मरगूबाई मंदिर नियोजित प्रकल्पातील प्रमुख विकासकामे व घटक:

क्र. विकास घटक तपशील व स्वरूप
१ मरगूबाई भक्तिधाम श्री बाळूमामा भक्तांचे निवास प्राथमिक सुविधा, आधुनिक वाचनालय, फिटनेस सेंटर निर्मिती.
२ पायाभूत सुविधा व परिसर सुशोभीकरण २४ तास अखंड वीज व्यवस्था (सौर ऊर्जा प्रणाली), हायमास्ट दिवे, शुद्ध पिण्याचे पाणी, सुलभ स्वच्छतागृहे आणि अंतर्गत रस्ते/काँक्रीटीकरण.
३ मूळ समाधी मंदिर व गाभारा जीर्णोद्धार ज्या पवित्र ठिकाणी बाळूमामांनी समाधी घेतली त्या मूळ मंदिराचे व गाभाऱ्याचे ऐतिहासिक पावित्र्य राखून आधुनिक पद्धतीने संवर्धन व नूतनीकरण.
४ अहिल्याबाई होळकर भवन व सभागृह राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांच्या ₹१.कोटीं २० लाखाच्या निधीतून उभारण्यात येत असलेले भव्य अहिल्याबाई होळकर भवन व बहुउद्देशीय सभागृहचे पावित्र्य जपणे व धनगर समाजाचे दैवत अहिल्याबाई होळकर प्रतिकृती (मोठा फोटो) स्थापन करणे. व पिवळा ध्वज उभारणे.
५ भव्य सभामंडप व दर्शन रांग व्यवस्थापन सभामंडपाचा विस्तार, ऊन-पावसापासून संरक्षणासाठी आधुनिक शेड्स आणि गर्दीच्या वेळी भाविकांसाठी सुसज्ज दर्शनरांगा निर्मिती. (Barricading System).
६ अखंड अन्नछत्र व महाप्रसादालय दररोज हजारो भक्तांसाठी विनामूल्य, सात्विक व शुद्ध महाप्रसादाची भव्य बैठक व्यवस्था, आधुनिक किचन.
७ अखंड शांती महायज्ञ व ज्योत प्रज्वलन करणे जगात शांतता नांदावी यासाठी हा पथदर्शी प्रकल्प सुरू करणे.
८ आदमापूर निरंतर स्वछता अभियान गाडगेबाबा स्वछता आर्मी स्थापन करून तीर्थक्षेत्र आदमपुरची ओळख स्वछ नगरी अशी करणे.
९ ५१ फूट उंच भव्य श्री बाळूमामा पुतळा आदमापूरच्या परिसरामध्ये ५१ फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचा मानस, जो भाविकांसाठी मुख्य आध्यात्मिक आकर्षण ठरेल.

Add Title

Add Sub Title