आमच्याबद्दल
- Home
- आमच्याबद्दल
We Complate 15000+ Project
Donet for charity
ऐतिहासिक मरगूबाई मंदिर : महत्त्व व पार्श्वभूमी
भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील मरगूबाई मंदिराशी सदगूरु बाळूमामांचे अतूट व अद्वैत नाते होते. बाळूमामांनी आपल्या अवतारी जीवनातील अखेरचा काळ याच मंदिरात व्यतीत केला आणि वयाच्या ७४ व्या वर्षी ४ सप्टेंबर १९६६ रोजी याच पवित्र मरगूबाई मंदिरात महासमाधी घेतली व जो मी हाय म्हणल त्याला मी हाय अन नाही म्हणल त्याला नाही. असा इशारा देत बाळू धनगर मेला म्हनशीला तर चुकशीला असे सांगत मरगूबाईला माझी बकरी व चाकर यांना सांभाळून घे अशी विनंती केली ती याच पवित्र जागेतून त्यामुळे या स्थानाला महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांच्या दृष्टीने अनन्यसाधारण धार्मिक, आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सुरुवातीला छोटेखानी असलेल्या या मंदिराचा विस्तार श्री. विजयराव गुरव यांनी गेल्या वीस वर्षांपासून ग्रामपंचायतीकडून आवश्यक सुविधा नसतानाही स्वतःच्या प्रयत्नांतून, स्वतःच्या नावाने वीज जोडणी घेऊन प्रकाशाची सोय करून आणि विविध विकासकामे राबवून केला आहे. आज या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीने वार्षिक भंडारा, भव्य यात्रा सोहळा, मोफत अन्नछत्र आणि समाधी दिनानिमित्त कण्याताक हा अमृत प्रसाद असे अखंड उपक्रम अविरत सुरू आहेत. यामुळे या मंदिराकडे भक्तांचा ओघ वाढत आहे.
आमची भूमिका व मुख्य उद्देश
१. फाउंडेशनची स्थापना का?
- पारदर्शक व शाश्वत कार्य: वैयक्तिक प्रगतीपेक्षा संस्थात्मक चौकटीतून मोठे सामाजिक प्रकल्प उभे राहतात.
- श्रद्धा व सेवेचा संगम: भाविकांच्या श्रद्धेला सामाजिक उपक्रमांची जोड देणे.
- तरुण व महिला विकास: रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण.
- मोठे प्रकल्प: रुग्णालय, अन्नछत्र व गोशाळांचे संस्थात्मक व्यवस्थापन.
२. आदमापूर येथूनच सुरुवात का?
- बाळूमामांची तपोभूमी: मामांचे समाधी स्थान व अखंड अन्नदानाची पवित्र भूमी.
- लाखो भक्तांचे श्रद्धास्थान: दरवर्षी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आधुनिक व सुरक्षित सुविधांची गरज.
- ३५ वर्षांचा लोकविश्वास: स्थानिक पातळीवर झालेला प्रत्यक्ष विकास व लोकांचा भक्कम पाठिंबा.
- पर्यावरणपूरक स्थान: पश्चिम घाटाच्या कुशीत निसर्ग व अध्यात्माचा संगम.
३. सहभागी / देणगी का द्यावी?
- प्रत्यक्ष सामाजिक बदल: गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण व रुग्णांना मोफत उपचार मिळवून देणे.
- १००% पारदर्शकता: अधिकृत बँक खात्यांमार्फत कारभार व हिशेब.
- ऐतिहासिक प्रकल्पात योगदान: मरगूबाई मंदिर नियोजित प्रकल्प व बाळूमामा संत सृष्टी उभारणीचा भाग बनणे.
- मामांच्या विचारांचा प्रसार: "सेवा हीच ईश्वराची पूजा" हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणणे.
Together We Can Serve Society Better Impact
Together, we can bring hope, support, and positive change to society through service, compassion, and community welfare initiatives.
donate now
How Can We Help You?
Find answers to some common questions about Sadguru Balumama Vikas Foundation, our mission, activities, and how you can become a part of our journey of social service and community welfare.






